We request your gracious presence on Pensioner's Day hosted at S. M. Joshi Hall on 17th December 2022.
President, AIRRF, Pune
We request your gracious presence on Pensioner's Day hosted at S. M. Joshi Hall on 17th December 2022.
President, AIRRF, Pune
स्वातंत्र्याच्या देशव्यापी अमृत महोत्सव निर्मित घर घर तिरंगा अभियाना नुसार संस्थेच्या वतीने कार्यालयात ध्वजवंदन झाले.
संस्थेचे एक ज्येष्ठ सभासद श्री.अशोकराव बहिरट यांचा निवृत्ती नंतर सुरू केलेल्या अध्यात्मिक कार्याची दखल घेऊन पुण विभागाच्या प्रबंधक रेणू शर्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१५ऑगस्ट२०२२ रोजी खडकी स्टेशन वर कार्यरत कर्मचाऱ्यांनी तेथेच कऱ्य करून निवृत्त झालेल्या ७५ वया वरील संस्थेच्या सभासदांना आमंत्रित करून त्यांचा याठीची सत्कार केला.
संस्थेची २०२१ २०२२ ची वार्षिक सर्वसाधारण सभा सप्टेंबर २०२२ मध्ये एस एम जोशी सभागुहत आयोजित केली होती.याप्रसंगी सभासदांच्या १० वी/१२वी तील नातवंडांच्या उल्लेखनीय यशा बद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच ७५ वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
स्वेच्छा निवृत्ती नंतर संस्थेचे सभासद श्री धनंजय जोशी आणि त्या आधीच सभासद असलेले श्री.सुनील कचरे यांनी सभासदांच्या संग्निकरण असलेल्या माहीतीत आणि कार्यात सुसूत्रता आणली. संस्थेचे उत्साही संस्थापक सदस्य आणि ८९ वया वर्षात सुध्दा चपळ असलेले श्री अण्णा बोधे यांनी ९० व त्यावरील सभासदांची यादी तयार केली .सर्व विभाग प्रमुखांना नोव्हेंबर२०२२ मासिक सभेत देवून त्यांची ख्याली खुशाली चा आढावा जानेवारी२०२३ पासून प्रत्येक महिन्यात घेण्यास सुरुवात केली.
संस्थेचे एक सभासद श्री. मुरलीधर शिंदे यांचा वयाचे शतक पूर्ण केल्याबद्दल विभागप्रमुख श्री.मूर्ती यांनी पुढाकार घेऊन विभागातील अन्य सभासद आणि कार्याध्यक्ष,अध्यक्ष ,सह घरी जाऊन सत्कार केला.
संस्थेचे उपाध्यक्ष आणि pckd चे विभागप्रमुख श्री.व्यंकटेश पांडे यांचे अल्प आजाराने ४/३/२०२३ रोजी दुःखद निधन झाले..२६/३/२०२३ रोजी आकुर्डी स्थानकात शोक सभा घेऊन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
संस्थेचे एक ज्येष्ठ सभासद श्री. अ शि फडके यांनी विस्मृती मुळे २०२० पासून निवृती वेतन बँकेच्या खात्यात तसेच जमा ठेवले होते आणि हयातीचा दाखला न दिल्याने बँकेने निवृती वेतन स्थगित केल होते. संस्थेचे सभासद आणि pckd विभागप्रमुख श्री मराठे यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र बँकेच्या अधिकारी वर्गाला समक्ष भेटून निवृती वेतन पुनर्स्थापित केले.
पेन्शनर din मेळावा १७/१२/२०२२,एस एम जोशी सभागुह,श्री. शाम भुर्के,प्रमुख अतिथी.
मावळ विभाग मेळावा २८/१२/२०२२,तळेगाव येथे संपन्न झाला.४५० सभासद आजूबाजूच्या मावळातील खेड्यातून आले होते. नव्याने उघडण्यात आलेल्या अथर्व हॉस्पिटल चे संचालक डॉ.अजित माने हे प्रमुख अतिथी होते.
८/३/२०२३ तोजी भिलवडी येथे उत्साही आणि सक्रिय असलेल्या सभासद श्री लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने रेणुका मंदिरात मेळावा आयोजित केला होता. कार्यकारिणीच्या ११ सभासद आणि मावळातील ४सभासद असे १५ जण पुण्याहून गेले होते. भिलवडी विभागातील १२५ सभासद उपस्थित होते.
Pensioner Day Celebrated on 20th Dec 2025 at S. M. Joshi Sabhagruha, Navi Peth Pune
38th AGMN Dashputre Shaikshnik Puraskar Event
वार्षिक सर्वसाधारण सभा व दशपुत्रे शैक्षणिक पुरस्कार कार्यक्रम 17 ऑगस्ट 2025 एस एम जोशी सभागृह पुणे